भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील सत्र न्यायालयात बार व बेंच यांनी संयुक्तरित्या शिवजयंती उत्सव साजरा केला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भुसावळ येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी.डोरले हे होते.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना न्या. डोरले म्हणाले की,छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श व्यक्तिमत्व होते.समाजाला आज त्यांच्या विचारांची नितांत गरज आहे असे याप्रसंगी त्यांनी आपले मत मांडले. या कार्यक्रमात माजी अध्यक्ष ॲड.एम.एस. सपकाळे,अध्यक्ष अड.तुषार पाटील,आय.आय.खान,नसीम देशमुख,सुनील पगारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमात या कार्यक्रमात अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस.बी.भन्साली,अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर.आर.भागवत, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्री पी ए साबळे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व्ही.जी.चौखंड,दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आर.आर. अहिर,दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर सौ.डी.एम.शिंदे आदी उपस्थित होते.भुसावळ वकील संघाचे अध्यक्ष तुषार पाटील,उपाध्यक्ष धनराज मगर, सहसचिव पुरुषोत्तम पाटील खजिनदार राजेश कोळी,महिला प्रतिनिधी जास्वंदी भंडारी हे उपस्थित होते.सूत्रसंचालन जास्वंदी भंडारी यांनी केले.



