भुसावळ ( प्रतिनिधी) – येथील विठ्ठल मंदिर वार्डातील जय लेवा ग्रुप व नवरत्न मंडळातर्फे गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त दिनांक १६ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी महाप्रसाद व भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त भुसावळातील जय लेवा ग्रुप व नवरत्न मंडळातर्फे १०० किलो खिचडी व ४० लिटरची कढीचा महाप्रसाद बनविण्यात आला होता. सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान परिसरातील भाविकांनी एकत्र येऊन गजानन महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करून महाआरती केली. त्यानंतर गजानन महाराजांचा जयघोष करण्यात आला .तदनंतर मलकापूर येथील जय गजानन महिला भजनी मंडळाने भजन सादर केले यावेळी भक्तगणांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. जय लेवा ग्रुप व नवरत्न मंडळातर्फे भक्तगणांना महाप्रसाद वाढण्यासाठी गजानन महाराज ग्रुपचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.शहरातील हजारो भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.



