भुसावळ(प्रतिनिधी – पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी भ्याड हल्ल्याला १४ फेब्रवारीला एक वर्ष पूर्ण झाले या हल्ल्यात ४४जवान शहीद झाले. या वीर जवानांच्या बलिदानाचे स्मृतीस येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या महिलांनी विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली वाहिली .स्थानिक नाहाटा चौफुली येथील शहीद स्मारकावर मेणबत्ती लावून या वीर जवांनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली .
यावेळी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ राजश्री नेवे , यांच्यासह , माया चौधरी, मोहिता चौधरी, सुनिता चौधरी, इंद्रा चौधरी ,रोहन पाटिल, ओम चौधरी, मयुर, क्रिशी नेवे ,अनुराधा टाक, आराधना टाक, मनिषा वानखेडे, मंदाकीनी केदारे, रुपाली नेवे, राधिका वाणी यांच्यासह महिलांनी शहीद स्मारकास अभिवादन केले व श्रद्धांजली वाहिली .



