भुसावळ( प्रतिनिधी)-
केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सी.ए.ए./एन.आर.सी.बिल कायदा लागू करण्यात येवू नये तो रद्द करावा याकरीता संविधान बचाव समितीने 15 जानेवारी 2020 पासून साखळी उपोषण सुरू केले आहे .
सी.ए.ए/एन.आर.सी विरोधात भुसावळ तहसील कार्यालयाच्या गेटच्या बाहेर संविधान बचाव समितीचे 15 जानेवारी पासून साखळी उपोषण सुरू असून सोमवारी उपोषणाचा 22 दिवस आहे. उपोषणात महिला,पुरुष व लहान मुलांचा सामवेश आहे.
केंद्र सरकारने सी.ए.ए/एन.आर.सी लागू करू नये यासाठी संविधान बचाव समिती तर्फे दिनांक 10 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास हवेत काळे फुगे सोडून केंद्र सरकारचा निषेध केला .यावेळी समितीचे पदाधिकारी व साखळी उपोषणकर्ते उपस्थित होते.
यावेळी मौ. सुलतान रजा,मौ. सदाम, फारुक देशमुख, अमीर खा सावदा, अजगर शाह, भुरा भाई सपकाळे ,मल्हार खैरनार, ईब्राहीम खान ऊर्फ राजा, सोऐब, अरब भाई, संविधान बचाऔ समीतीचे सलीम शेठ चुडी वाले मो मुनंव्वर खान, साबीर मेम्बर, दानीस पटेल, अशरफ कुरेशी, अजहर भाई मजहर भाई, फरान भाई,ईम्रान खान, युनुस मामा, जुनेद खान आदी उपस्थित होते .



