जळगाव स्टेशनवर फोर्ट बँड चेक तिकीट तपासणी ; एकूण 1 लाख 5 1 हजार दंड वसूल

भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वे, भुसावळ विभागातील जळगाव स्थानकात विना तिकीट व अयोग्य तिकिटाचा प्रवास थांबविण्यासाठी 4 रोजी किल्ला बंद तिकिट तपासणी करण्यात आली .
भुसावळ विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक के.के. शर्मा आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार (टी.जा) यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी करण्यात आली.
जळगाव स्थानकात या तपासनीत एकूण 25 तिकीट तपासणी आरपीएफ कर्मचारी स्टॉफ 5 यांनी 306 प्रवासी अनियमित प्रवास करतांना आढळले . यां प्रवाशां कडून एकूण 1 लाख 5 1 हजार 45 रुपये दंड वसूल करण्यात आला . या तपासणीत विनातिकिट यात्रा करणाऱ्यां 81 केसेस केल्या त्यांचे कडून 41 हजार 455 रुपये दंड वसूल करण्यात आला . अनियमित प्रवास करणाऱ्यां प्रवाश्यां विरुद्ध 223 केसेस करून त्यांचे कडून 1 लाख 9 हजार 450 रुपये दंड वसूल करण्यात आला .विना बुकिंग केलेल्या सामानावर 2 प्रवासी यांचे कडून 436 रुपये दंड वसूल केला
.या मोहिमेमध्ये एकूण लाख 9 हजार 450- चे दंड वसूल करण्यात आला, दंड भरण्यास असमर्थ असलेल्या 2 प्रवाश्यांवर कलम 144
तसेच 147 कलम अन्वये कारवाई करण्यात आली. तसेच 5 प्रवाश्यां विरुद्ध 155 कलम अन्वये कारवाई करण्यात आली. या मोहिमेमध्ये वाय.डी. पाठक (मुख्य तिकिट निरीक्षक तपासणी) यांच्यासह एटीएस पथक, फिर्यादी पथक, आयसीपी चेक, सजंग पथक, ओडी स्टाफ आणि इतर तिकिट तपासणी कर्मचारी उपस्थित होते.
रेल्वे प्रशासनाच्या वतीने प्रवाशांना नेहमीच योग्य तिकिट घेऊन प्रवास करण्याची विनंती करण्यात आली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *