अल्पवयीन मुलीस फूस लावून अपहरण करणाऱ्यास अटक ; साथीदार फरार ;


भुसावळ (प्रतिनिधी )

तालुक्यातील खडका येथील गणेश कॉलनी मधील ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने अल्पवयीन मुलीचे फूस लावून अपहरण करणाऱ्यां आरोपीस तालुका पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे .
अल्पवयीन मुलीस ५ रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील साकरी येथील सराईत गुन्हेगार अमोल तुळशीराम भोळे याने फूस लावून पळवून नेवून तक्रारदारास शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची फोन वरून धमकी दिली याबाबत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे २३ रोजी तक्रार दिली होती. मुलीचा शोध घेऊन मुलगी ताब्यात मिळावी तसेच अमोल भोळे व त्यांचे साथीदार सह त्यांच्यावर कायम स्वरूपी कारवाई करण्यात यावी असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी तक्रार अर्जाची दखल घेतल्यानंतर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून २३ रोजी तालुका पोलीस ठाण्याचे पथक पुणे चाकण येथुन मुलीस ताब्यात घेऊन परतले. अपहरण करणाऱ्या अमोल भोळे यास २४ सप्टेंबर रोजी अटक केली असून त्याचा साथीदार हा पसार झाला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *