भुसावळ (प्रतिनिधी )-
कोविड टेस्टसाठी होत असलेल्या अडचणी दुर करण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना शिवसेना तालुका संघटक प्रा धिरज पाटिल यांनी निवेदन दिले आहे .
मागील काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. जळगाव नंतर भुसावळ तालुक्यात रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत. कोरोना आहे किंवा नाही यासाठी ज्या टेस्ट केल्या जात आहेत त्या टेस्ट करण्यासाठी निर्धारित केलेल्या केंद्रात वेळेचे बंधन आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना औषधी व उपचाराच्या पध्दतीसुद्धा पूर्ण माहीत नसल्याने अनेक ठिकाणी त्यांची फसवणूक सुद्धा होत आहे. तालुक्यातील अनेक रुग्णांना गोदावरी व जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते तेथे घडलेल्या घटनांमुळे त्यांची धास्ती वाढते. कोरोना आजारामुळे कमी तर धास्तीनेच रुग्ण दगावतो.
खाजगी रुग्णालयात किंवा ठिकाणी कोरोना टेस्ट करणे सामान्यांना परवडणारे नाही. तसेच व्यक्तीच्या शरीरातील ऑक्सिजन मात्रा कमी असल्यास नॉन कोविड सेंटरला त्यांच्यावर उपचार करण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे शासकीय आरोग्य केंद्रात २४ तास कोरोना टेस्टींगची सुविधा उपलब्ध करावी. कोरोनाच्या धास्तीने खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे गैरसमज पसरत आहेत. याबाबतीत शासनाने मार्गदर्शनतत्वे प्रसिद्ध करावीत. जिल्ह्यात ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता भासणार नाही यासाठी विशेष नियोजन करावे. शक्यतो प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड टेस्टची सुविधा उपलब्ध केल्यास अनेक अडचणी सहज कमी होतील. जनहितार्थ आमच्या मागणीचा सकारात्मक विचार करावा असेही निवेदनात नमूद
केले आहे .



