भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाविषाणू च्या प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत विद्यार्थी घरीच बसून आहेत या काळाचा विद्यार्थ्यांनी सदुपयोग केला पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या विविध घटनांकडे संशोधनात्मक दृष्टिकोनातून बघितल्यास नावीन्यपूर्ण संशोधन करण्याची संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मंजुषा क्षीरसागर यांनी केले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ जळगाव रोटरी क्लब ऑफ ताप्ती व्हॅली भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय विज्ञान शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी चला मुलांनो प्रयोग करूया या कार्यक्रमाचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले होते
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक जालना येथील टिकारीया सायन्स सेंटरचे प्रमुख संजय टिकारीया होते विशेष अतिथी म्हणून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ. मंजुषा क्षीरसागर, डिस्ट्रिक्ट रोटरी 3030 चे प्रांतपाल शब्बीर शाकीर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष किशोर राजे डिस्ट्रिक्ट रोटरी3030 चे माजी प्रांतपाल राजीव शर्मा यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. क्षीरसागर म्हणाल्या की दैनंदिन जीवनामध्ये वावरत असतांना विविध घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात आजच्या कार्यशाळेमध्ये आपण दररोज त्या जीवनातील व्यवहारातील विविध क्रियांमधील साधे साधे प्रयोग करत असतो परंतु त्याची आपल्याला कल्पना नाही या माध्यमातून आपल्या संकल्पना दृढ होतात विद्यार्थ्यांनी मिळालेल्या या सुट्ट्यांचा अभ्यासासोबतच नावीन्यपूर्ण संशोधन वर लक्ष केंद्रित केले पाहिजे तसेच घडणारी प्रत्येक घटना का कशी आणि केव्हा याचे प्रश्न मिळवण्याचा प्रयत्न केल्यास निश्चित त्यांच्यामध्ये संशोधन वृत्ती जोपासली जाऊ शकते
या कार्यक्रमाला जालना येथील टिकारीया सायन्स सेंटरचे अध्यक्ष संजय टिकारीया यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रयोगाचे साहित्याची यादी दिली होती व कार्यशाळेच्या वेळी ऑनलाईन कृती करावयास सांगितली यामधून विद्यार्थ्यांनी घरच्या घरी अभ्यासक्रमातील प्रयोग केले यामध्ये दृष्टी सातत्य, कार्बन-डाय-ऑक्साईडन बाष्पीभवन, स्थितिक विद्युत बल, हवा जागा व्यापते, हवा ऊर्जा आहे, बंदिस्त हवेला दाब दिला असता स्फोट होतो, न्यूटनचे गतीविषयक नियम, ध्वनि निर्मिती, न्यूटनची तबकडी, जडत्व यासह विविध प्रयोग विद्यार्थ्यांनी स्वतः प्रात्यक्षिकातून करून घेतले
इन्स्पायर वारियर बना
कोरणा विषाणू च्या विरुद्ध अनेक जण लढत आहेत त्यांना कोरणा योद्धा म्हटले जाते परंतु या काळात देखील शिक्षण सुरू राहावे यासाठी अनेक जण धडपडत आहेत आणि ते खऱ्या अर्थाने लिटरसी वारियर म्हणून त्यांना संबोधता येईल विद्यार्थ्यांनी आजच्या कार्यशाळेचा लाभ घेऊन इन्स्पायर वारियर झाले पाहिजे
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे सचिव सुनील वानखेडे यांनी तर आभार रोटरी क्लब चे प्रोजेक्ट सेक्रेटरी संजय भटकर यांनी केले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी क्लबचे प्रेसिडेंट सुधाकर सनंसे प्रोजेक्ट चेअरमन योगेश इंगळे प्रोजेक्ट कॉर्डिनेटर जीवन महाजन प्रदीप सोनवणे समाधान जाधव यांनी परिश्रम घेतले
शब्बीर शाकीर
प्रांतपाल डिस्ट्रिक्ट रोटरी 3030.
नाविन्यपूर्ण शोध करणाऱ्यांचा होणार सन्मान
लॉकडाउनच्या काळामध्ये विद्यार्थी घरी असले तरी अभ्यासक्रम सुरू आहे त्यांच्याकडे जास्तीचा वेळ आहे या काळाचा सदुपयोग करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण शोध केले असतील तर त्यांनी त्याचे व्हिडिओ तयार करून जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाकडे पाठवा त्यांची स्पर्धा घेतली जाईल आणि या स्पर्धेतील नाविन्यपूर्ण चांगले प्रयोग करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित केले जाणार
किशोर राजे अध्यक्ष
जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ



