वरणगावातील राकाँची आजची बैठक पावसा अभावी रद्द ;

भुसावळ – भुसावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक शुक्रवारी दुपारी चार वाजता वरणगाव येथील मराठा समाज मंगल कार्यालयात होणार होती परंतु अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे आजची बैठक रद्द करण्यात आली आहे. येत्या पुढील काही दिवसात जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र भैय्या पाटील आणि माजी आमदार संतोष चौधरी यांनी तारीख व वेळ दिल्यानंतर ही बैठक होणार आहे. याची सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, राष्ट्रवादी प्रेमी नागरीकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष दीपक मराठे व पदाधिकार्‍यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *