भुसावळ (प्रतिनिधि )-
स्वच्छता पंधरवाड्याचा भाग म्हणून भुसावळ विभागातील एनएसजी १ ते एनएसजी ४ या स्थानकांवर “स्वच्छ स्टेशन दिन” साजरा करून याबाबत जनजागृती करण्यात आली. भुसावळ स्थानकावर स्थानक संचालक जी.आर.अय्यर यांचे तर्फे प्रवाशांना प्लस्टिकच्या बाटल्यांचे क्रशर मशीन वापरण्यासाठी प्रात्यक्षिके दाखवून जनजागृती करण्यात आली .
नाशिक, अमरावती,शेगाव, पाचोरा, धुळे,देवळाली,जळगाव, ब-हाणपूर,खंडवा स्थानके सेफ्टी गीअर, हातमोजे व मास्क वापरुन वेटिंग रूम,शौचालये, नाले व आवारांची मैन्युअल-मेकेनाइज्ड द्वारे साफसफाई करण्यात आली .यावेळी
कोविड १९ साथीचे नियम पाळण्यात आले आणि सामाजिक अंतर राखत स्वछता करण्यात आली .



