वरणगाव ग्रामीण रुग्णालयात होणार दररोज स्वॅब तपासणी – डॉ . क्षितीजा हेंडवे ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दररोज स्वॅब तपासणी होणार असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. क्षितीजा हेंडवे यांनी दिली .
वरणगाव शहरांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना चाचणी तपासणी कॅम्प झालेला नव्हता तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या अंतर्गत ग्रामीण भागातील विविध खेड्यामध्ये स्वॅब
चाचणीचे कॅम्प सुरू होते शहरातील रुग्णांना ग्रामीण भागात जाऊन चाचणी करावी लागते परंतु शासनाच्या वतीने आता ग्रामीण रुग्णालय मध्ये कोरोना चाचणी तपासणी सुरू करण्यात आलेली आहे. ही तपासणी सकाळी 9 ते 12 या वेळेत होईल आधी नाव नोंदणी व 12 नंतर स्वॅब घेण्यात येतील तरी नागरिकांनी न भीता स्वॅब तपासणी करून घ्यावी असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ क्षीतिजा हेडवे यांनी केले आहे . याकामी त्यांचे सहकारी मदत करीत असल्याचेही डॉ हेडवे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *