भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल भाग ५, गुरन ८३६ /२०२० भादवी कलम३०२,१४३,१४४,१४७,१४८,१४९, प्रमाणे दि.१४ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यात पाचपैकी तीन फरार आरोपींच्या अवघ्या पोलीसांनी सात तासात मुसक्या आवळल्या होत्या.चौथा फरार आरोपी शेख आमिर शेख युसुफ (वय १८) रा.पंधरा बंगला याची उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांना मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून शेख अमिर यांस दि.१४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता पंधरा बंगला भागातून पथकाने ताब्यात घेतले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.अनिल मोरे,मंगेश गोटला, पोना. रवींद्र बिऱ्हाडे,किशोर महाजन,रमण सुरळकर,उमाकांत पाटील,समाधान पाटील,पोकाॅ. विकास सातदिवे,प्रशांत परदेशी,ईश्वर भालेराव,योगेश महाजन,कृष्णा देशमुख यांच्या पथकाने केली.



