रावेर –

रावेर तालुका शिवसेना महिला आघाडीच्या तालुका संघटीका सौ रुपालीताई राणे यांचा अचानक मृत्यू झाल्याचे कळताच आ.चंद्रकांत पाटील यांनी रझोदा येथे भेट देवून
त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले. यावेळी “आज रूपालीताई आपल्यात नाहीत यावर माझा विश्वास बसतच नाहीय., रुपालीताई अत्यंत सोज्वळ स्वभावाच्या होत्या. रावेर तालुका शिवसेनेमध्ये त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या दुःखात मी सहभागी असून एक रावेर तालुक्यातील महिला नेतृत्व आपण गमावले ” असल्याचे भावनात्मक उद्गार आ.चंद्रकांत पाटील यांनी सात्वनपर भेटीदरम्यान व्यक्त केले .


