वरणगाव (प्रतिनिधी )-
शहरातील रुक्मिणी फाउंडेशन च्या वतीने शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रातिनिधिक स्वरूपात गुरुरत्न पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात येते यानुसार यावर्षी 22 शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे प्रशस्तीपत्र स्मृतिचिन्ह व शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन झाल्याने राष्ट्रीय दुखवटा संपल्यानंतर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती रुक्मिणी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले
यामध्ये महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर ए वाघ, डॉ. बी एम पाटील, हरी कीटकूल बढे माध्यमिक विद्यालय पिंपळगाव खुर्द चे मुख्याध्यापिका उषा रडे, नेहरू माध्यमिक विद्यालय तळवेल चे पर्यवेक्षक सुरेश अहिरे, सुशीला राम कदम प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका संगीता चौधरी, गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक विद्यालयाचे अविनाश देशमुख, दिनकर निंबोळकर, हबीब खान हमीद खान (फक्रुद्दीन अली अहमद उर्दू हायस्कूल, वरणगाव), शैलेश नेहेते (अरुणोदय माध्यमिक विद्यालय, बोहर्डी खुर्द), प्रताप घोगरे (माध्यमिक विद्यालय वझररखेडे), पंकज माळी (शास्त्री विद्यालय पिंपळगाव बुद्रुक), मालती मराठे (जि प केंद्र शाळा, वरणगाव), राकेश कुलकर्णी (जि प मराठी कन्या शाळा, वरणगाव) आशा निंबाळकर (जि प मराठी शाळा, सिद्धेश्वरनगर), सबिना समद खाटीक (जि प उर्दू मुलांची शाळा, वरणगाव) जावेद अहमद इफ्तेखान अहमद (जि प उर्दू कन्या शाळा वरणगाव), अरुणा भास्कर पाटील (जि प मराठी मुलांची शाळा, तळवेल), अनिल बळीराम दांडगे (जि प मराठी शाळा तपत कठोरा), सुवर्णलता तायडे (जि प मराठी शाळा करंजी पाचदेवळी), सुरेश सुरवाडे (जि प मराठी शाळा मनुर बुद्रुक ता. बोदवड), राजेंद्र देवराम तायडे (जि प मराठी शाळा तामसवाडी, ता. रावेर), शिल्पा चौधरी (च.ह बढे प्राथमिक शाळा, वरणगाव) या शिक्षकांचा सन्मान लवकरच केला जाणार आहे अशी माहिती रुक्मिणी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली



