भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र शासनाचा निधी मिळावा अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांच्या कडे दिपक काशिनाथ धांडे व भुसावळ शहर
पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी केली असून याबाबत शनिवार रोजी निवेदन देण्यात आले आहे .
भुसावळ शहरातील पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना भुसावळ नगर पालिकेने जानेवारी महिन्यामध्ये एकूण ३०० लाभार्थी पैकी४८ लाभार्थ्यांना बांधकाम परमिशन पत्र दिले त्या नंतर लाभार्थ्यांनी भाड्याची घरे घेऊन आप आपल्या राहत्या घराचे कामे सुरू केली आज पर्यंत सर्व लाभार्थ्यांचे ८० टक्के कामे पूर्ण झालेली आहे परंतु भुसावळ नगर पालिकेने लाभार्थ्यांना फक्त १ लाख रुपयांचे अनुदान दिलेली आहे बऱ्याच लाभार्थ्यांनी आपल्या नाते वाईका कडून उसने पैसे घेतलेले आहे तर काहींनी व्याजाने पैसे घेऊन घरकुल ची कामे केलेली आहे त्यातच गेल्या ८ महिन्या पासून ४ ते ५ हजार रु घराचे भाडे भरावे लागत आहे लॉक डाऊन मुळे सर्व आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे पुढील निधी मिळावा यासाठी नगरपालिका येथे गेले असता केंद्र शासनाचा निधी आला नसल्या कारणाने लाभार्थ्यांना निधी देता येणार नाही असे सागितले जाते त्या मुळे लाभार्थ्यांना आत्म हत्या करण्याची वेळ आलेली आहे
जी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने सुरू झालेली आहे त्याच योजने साठी केंद्र कडून भुसावळ नगरपालिकेतील पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना १ रुपयाचा सुध्दा निधी देण्यात आलेला नाही त्यामुळे लाभार्थ्यांच्या मनात केंद्र शासणाप्रती चीड निर्माण होत आहे व त्या मुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जनमानसात प्रतिमा मलीन होत आहे त्यामुळे या निवेदनाचा सहनिपुर्वक विचार करून भुसावळ नगरपालिकेला केंद्रशासनाच्या पंतप्रधान आवास योजनेचा निधी लवकरात मिळावा असेही निवेदनात नमूद आहे .



