भुसावळ (प्रतिनिधी )-
भर पावसातही भाविकांचा उत्साह कायम असल्याचे दिसून आले दरम्यान गणेश उत्सवाचे व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रॅपीड अॅक्शन फोर्सचे शंभर जवान शहरात दाखल झाले आहे .
विघ्नहर्त्या गणरायाची शनिवारी शहरात मोठ्या उत्साहात भाविकांनी स्थापना केली. पावसाची संततधार असलीतरी भाविकांचा उत्साह मात्र कायम होता. शहरातील ७४ तर ग्रामीण भागात २७ मंडळांनी श्रींची स्थापना केली. शनिवारी गणेश चतुर्थी निमित्त भाविकांनी घरोघरी आणि शहरातील सार्वजनिक मंडळातर्फे श्रींची स्थापना करण्यात आली. घरामध्ये दोन फुटी तर सार्वजनिक गणेश मंडळात चार फुटांपर्यंत उंचीची मूर्ती बसविण्याची परवानगी पोलिसांनी दिल्याने भाविकांनी सूचनांचे पालन केले. रात्री उशिरापर्यंत भाविकांतर्फे आणि मंडळांच्या पदाधिकार्यांनी श्रींची स्थापना केली.
शहरात शासनांच्या नियमांचे पालन करून अत्यंत साधेपणे श्री गणेश स्थापना केली .कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले आहे त्यामुळे बिकट परीस्थिती निर्माण झाली आहे.अश्या परिस्थितीत सर्व गणेश मंडळ भक्तांनी व नागरिकांनी संयम राखून सामाजिक जाणीव ठेवून व शासनाचे नियम पाळून श्री गणेशाचे स्वागत अत्यंत साधेपणाने केले . कोरोना विषाणूचे हे संकट लवकरात लवकर नष्ट होऊन सर्वत्र सुख शांती व आनंदाचे वातावरण निर्माण होवो अशी प्रार्थना करीत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला साकडे घालून सर्व भक्तांनी केली प्रसंगी शासनांच्या नियमांचे पालन करून घरोघरी व गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी साधेपणाने श्री स्थापना केली .
आमदार सावकारें यांचे गणरायाला साकडे
संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे बिकट परीस्थिती निर्माण झाली आहे . देशावर आलेले हे संकट लवकरात लवकर नष्ट होऊन सर्वत्र सुख शांती व आनंदाचे वातावरण निर्माण होवो ,असे भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांनी श्री गणरायाच्या चरणीं नतमस्तक होत गणरायांपुढे साकडे घातले आहे .
दरवर्षी प्रमाणे यंदाही आमदार संजय सावकारे यांच्या घरी भक्तीमय वातावरणात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली . आमदार संजय सावकारे यांनी सपत्नीक श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा केली .
शहरातील उद्योजक तथा नगरसेवक मनोज बियाणी यांच्या निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली . यावेळी मनोज बियाणी व सौ संगिता बियाणी यांनी देखील कोरोनाचे संकट जाऊन सर्वत्र सुख शांती नांदू दे अशी गणरायांपुढे प्रार्थना केली.



