भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वेच्या प्रदिर्घ सेवेनंतर भुसावळ रेल्वे विभागातुन दिनांक 31 जुलै 2020 रोजी 49 रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाले.
या सेवानिवृत्ती संदर्भात रेल्वे द्वारा प्रथम वर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कोरोना च्या प्रादुर्भावामुळे समारंभाचे आयोजन न करता सेवानिवृत्त कर्मचार्यांचा यथोचित सन्मान वर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमा द्वारे तसेच त्यांच्या सेवेच्या कार्यालयात रेल्वे प्रतिनिधि म्हणुन खंडवा, अकोला, भुसावल, जळगांव, नांदगाव, मनमाड, नाशिक, इ. ठिकाणी कल्याण निरीक्षकांनी जाऊन पी.पी.ओ फोंल्डर दिलेत. सेवानिवृत्ती बद्दल कर्मचार्यांना विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज कुमार सिन्हा, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांनी सेवानिवृत्ती बद्दल संबोधित करुन पुढील भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.



