भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ शहरात पोलिसांनी गावठी कट्टे बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई सत्र सुरु केले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनला दोन गावठी कट्टे व २ जिवंत काडतुस जमा करण्यात आले आहे.
अवैध बेकायदेशीर शस्त्रसाठा बाळगल्या प्रकरणी आरोपी नवीन सुरेश लोखंडे यांच्याकडून एक गावठी कट्टा,राहुल उर्फे बाळा डिगंबर सोनवणे यांच्या सांगण्यावरून निलेश चंद्रकांत ठाकूर आणि निखिल सुरेश राजपूत यांच्या ताब्यातून एक गावठी कट्टा व २ जिवंत काडतुस असे जप्त केले आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव भाग्यश्री नवटके,उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांचे मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे क्राईम पोलीस स्टेशनचे पोउनी अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि स्वप्नील नाईक,पोहेकॉ रविंद्र पाटील, पोना चिंचोले ,पोकॉ दीपक मेढे, पोकॉ नरेंद्र वारुळे,भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे पोहेकॉ साहिल तडवी,पोहेकॉ मोहम्मद अली सैय्यद,पोहेकॉ संजय पाटील,पोना सुनील सौंदाणे,पोकॉ जुबेर शेख,पोकॉ सोपान पाटील,पोकॉ जितेंद्र सोनवणे यांनी ही कारवाई केली आहे .



