प्रभाग क्र.२० मध्‍ये स्‍वखर्चाने गटारींची स्‍वच्‍छता

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील प्रभाग क्र.२० मधील म्हाडा कॉलनी,मिरची ग्राऊंड व हुडको कॉलनी भागातील गटारी ह्‍या मागील २ वर्षांपासून तुडूंब भरलेल्‍या होत्‍या.
याबाबत नगरपरिषदेच्‍या अधिका-यांना वारंवार सूचना व पत्रव्यवहार करून तसेच नगरपरिषदेचे नगराध्यक्ष यांनी स्वतः जागेवर जाऊन पाहणी करून सुद्धा कोणतीही हालचाल व गटारीची सफाई केली जात नव्‍हती .
तसेच तुडुंब भरलेल्या गटारींमुळे घाण पाणी नागरिकांच्या घरापर्यंत व रस्‍त्‍यावर येत होते. तसेच दुर्गंधी. व साथीच्या रोगाची लागण होण्याची भीती निर्माण झाली होती .
या सर्व बाबी लक्षात घेऊन नगरपालिका प्रशासन व कर्मचारी यांच्यावर अवलंबून न राहता प्रभाग क्र.२० चे नगरसेवक महेंद्रसिंग(पिंटू ) ठाकूर यांनी स्वखर्चाने आपले खासगी कर्मचारी लावून त्यांना योग्य तो मोबदला देऊन गटारींच्‍या सफाईचे काम सुरु केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *