कोरोनावर मात केलेल्या योध्दाचे फुलांनी स्वागत ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
जळगाव महानगरनंतर भुसावळ शहर जिल्ह्यातील कोरोना हॉटस्पॉट झाले आहे. गुरुवार २ जुलै रोजी एका राजकीय पक्षाचे शहर प्रमुख, एक नामांकित वकील व सामाजसेवक कोरोनावर यशस्वी मात करून रेल्वे रुग्णालयातून (कोव्हिड सेंटर) मधून बाहेर पडले. कोरोनावर यशस्वी मात केली म्हणून शिवसेना तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललित मुथा, उपशहर प्रमुख पवन नाले, धनराज ठाकूर, युवा सेनेचे शहर प्रमुख सुरज पाटील, बापू भारंबे, योगेश कुटे, भा.ज.यु.मो.चे माजी जिल्हा उपाध्यक्ष हेमंत भंगाळे, अमोल पाटील, गणेश पाटील व विठ्ठल मंदिर वार्ड व राम मंदिर वार्ड येथील युवक व नागरिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. यावेळी नगरसेवक पिंटु कोठारी यांनी या कोरोना योध्द्यांचे अभिनंदन केले. यानंतर विठ्ठल मंदिर वार्ड येथे युवकांनी व नागरिकांनी राजकीय पक्षाच्या या शहर प्रमुखाचे उत्सफुर्तपणे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *