रेल्वे द्वारा उधना ते झंझारपूर आणि मधुबनी दरम्यान अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्या चालविण्यात येणार

भुसावळ (प्रतिनिधी)-
आगामी पूजा, दिवाळी आणि छठ सणांच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने उधना ते झंझारपूर आणि मधुबनी दरम्यान अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांची सोय तसेच वाढीव प्रवासी वाहतुकीचे सुरळीत नियोजन करण्याच्या उद्देशाने या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. या विशेष गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :

1) उधना–झंझारपूर अनारक्षित विशेष गाडी (12 फेऱ्या)
09075 विशेष अनारक्षित गाडी दिनांक 5, 6, 9, 10, 11 आणि 12 नोव्हेंबर 2026 रोजी उधना येथून 11.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 23.30 वाजता झंझारपूर येथे पोहोचेल.

09076 विशेष अनारक्षित गाडी दिनांक 7, 8, 11, 12, 13 आणि 14 नोव्हेंबर 2026 रोजी झंझारपूर येथून 06.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 18.45 वाजता उधना येथे पोहोचेल.

थांबे : चलथान, बारडोली, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, दरभंगा आणि सकरी.

2) उधना–मधुबनी अनारक्षित विशेष गाडी (6 फेऱ्या)
09035 विशेष अनारक्षित गाडी दिनांक 5, 9 आणि 12 नोव्हेंबर 2026 रोजी उधना येथून 08.35 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 21.00 वाजता मधुबनी येथे पोहोचेल.

09036 विशेष अनारक्षित गाडी दिनांक 7, 11 आणि 14 नोव्हेंबर 2026 रोजी मधुबनी येथून 06.45 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 18.45 वाजता उधना येथे पोहोचेल.

थांबे : चलथान, बारडोली, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, मानिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर, मुझफ्फरपूर, समस्तीपूर आणि दरभंगा.

वरील दोन्ही विशेष गाड्यांची डब्यांची रचना : 22 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि 1 सामान्य द्वितीय श्रेणी सह गार्ड ब्रेक व्हॅन.

प्रवासी तिकीट बुकिंगसाठी RailOne ॲपचाही वापर करू शकतात.
या विशेष गाड्यांच्या विविध स्थानकांवरील आगमन व प्रस्थानाच्या सविस्तर वेळापत्रकासाठी NTES / भारतीय रेल्वे चौकशी संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES ॲप डाउनलोड करावे.