भुसावळात नियमांचे उल्लंघन ; हातगाडी व्यावसायिकासह दोन दुकानदारांवर विरुद्ध कारवाई ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रस्त्यावर हातगाडी लावुन व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांसह दोन दुकानदारांवर पालिकेने नियुक्त केलेल्या पथकाने मंगळवार ३० जून रोजी
दंडात्मक कारवाई केल्याने व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे .
भुसावळ शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे .कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडुन उपाययोजना केल्या जात आहे . नागरीकांची गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने व्यावसायिकांना व दुकानदारांना काही ठराविक दिवस व वेळ ठरवुन देण्यात आली आहे .मात्र काही व्यावसायिक व दुकानदार नियमाचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून आल्याने मंगळवारी शहरातील खडका रोडवरील दोन दुकाने सील करण्यात आली तर दोन दुकानदारांकडुन प्रत्येकि पाच हजार रूपये दंड वसुल करण्यात आला . तसेच रस्त्यावर परवानगी नसतांना व्यवसाय करणाऱ्याचा माल जप्त करण्यात आला आहे .नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कारवाई सुरूच राहिल असे नगरपालिका पथकाचे प्रमुख संजय बानाईते यांनी सांगितले आहे .
हि कारवाई नगर अभियंता पंकज पन्हाळे , परवेज शेख , राजु पाटील , अनिल भाकरे यांनी केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *