लोकशाही, संविधान आणि मतदानाच्या अधिकाराबाबत जनजागृती करणार भुसावळ (प्रतिनिधी ) : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या भुसावळ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘मत वाचवा, देश वाचवा’ अभियानांतर्गत पदयात्रा व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा महात्मा गांधी पुतळा येथून दुपारी ३ वाजता सुरू होणार असून, तहसील कार्यालय येथे सायंकाळी ५ वाजता समारोप होणार आहे. या पदयात्रेदरम्यान शहरातील नागरिकांशी संवाद साधून लोकशाही, संविधान आणि मतदानाच्या अधिकाराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या अभियानात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भुसावळ शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक अहमद भाई कुरेशी यांनी केले आहे. —


