भुसावळात गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह आरोपी ताब्यात ; भुसावळ बाजारपेठ पोलिसांची धडक कारवाई


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ बाजारपेठ
पोलिस ठाण्यातील गोपनीय पथकाने गुप्त माहितीच्या आधारे येथील जामनेर रोडवरील साई बाबा मंदिरा जवळून एजाज उर्फ सोन्या खान अयुब खान (26, रा.जाम मोहल्ला, भुसावळ) या संशयीत आरोपीच्या ताब्यातून गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतूस जप्त केले.
आरोपीच्या ताब्यातून 15 हजार रुपये किंमतीचा लोखंडी धातूचा गावठी कट्टा तसेच एक हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कारवाई करण्यात येवून
जप्त करण्यात आले.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलिस अधिकारी गजाजन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक अनिल मोरे, किशोर महाजन, रमण सुरळकर, रविंद्र बिर्‍हाडे, तुषार पाटील, दीपक पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईस्वर भालेराव, कृष्णा देशमुख, सुनील साळुंखे आदींनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *