भुसावळ (प्रतिनिधी) –
श्री राजपूत करणी सेनेची तालुका स्तरावरील नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्यात दै देशदूत चे खंडाळा येथील पत्रकार हर्षल पाटील यांची सेनेच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उप अध्यक्षपदी कंडारीचे भूषण जेठवे व भुसावळ शहर अध्यक्ष पदी गोपी राजपूत यांची निवड करून खान्देश प्रसिद्ध प्रमुख अभिजात राजपूत यांनी कार्यकारणी जाहीर केली. या निवडी बद्दल शिवसेना तालुका प्रमुख समाधन महाजन ,कृषी उत्पन्न बाजार सभापती अशोक पाटील, जेष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण, काँग्रेसचे योगेंद्रसिंग पाटील, राजपूत समाज अध्यक्ष किशोर महाजन, चंदू चव्हाण , पोलीस पाटील रतीलाल चौधरी, दामोदर राजपूत, जयविर राजपूत, गौरव पाटील, संदिप पाटील, हर्षल पाटील, पंकज पाटील, सुनिल पाटील यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देवून अभिनंदन केले आहे.



