लॉकडाऊन दरम्यान मध्य रेल्वेने प्रवाश्यांच्या सोडविल्या समस्या ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे जागतिक पातळीवरील संकट काळात भारतीय रेल्वे सक्रिय भूमिका पार पाडत आहे. मध्य रेल्वेच्या सामान्य प्रशासना अंतर्गत असलेल्या सार्वजनिक तक्रार कक्षाने, प्रवासी/भागधारकांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे निराकरण करण्यात उल्लेखनीय कामगिरी दर्शविली आहे. लॉकडाऊन कालावधीतही रेल्वेकडे अनेक सूचना, मागण्या व तक्रारी आल्या आहेत. हे “रेल मदत ” आणि “सेंट्रलाइज्ड पब्लिक ग्रिव्हेनेसेस रिड्रेस एंड मॉनिटरिंग सिस्टम” द्वारे प्राप्त झाले. मध्य रेल्वेच्या पब्लिक ग्रिव्हेनेसेस सेलने अशा उद्भवलेल्या बाबींवर तातडीने कारवाई केली. सामान्य लोक, प्रवासी, कर्मचारी आणि भागधारकांनी ज्यांनी समस्या मांडल्या त्यांनी देखील कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांच्या तक्रारी/समस्या सोडविण्यासाठी त्वरित कारवाई केल्याबद्दल कौतुक केले आणि आभार मानले आहेत.
२३ मार्च ते १८ जून २०२० पर्यंत “रेल मदत ” च्या माध्यमातून प्राप्त तक्रारींचे निराकरण :
मध्य रेल्वेला “रेल मदत ” च्या माध्यमातून २३ मार्च ते १८ जून २०२० पर्यंत ९१० प्रवाशांच्या विविध समस्या प्राप्त झाले. १८ जुन्या तक्रारींसह प्रत्येक प्रकरणात त्वरित कारवाई करण्यात आली व एकूण ९२३ तक्रारींचे निराकरण केले गेले.
“केन्द्रीय सार्वजनिक तक्रार निवारण व देखरेख प्रणाली” (Centralised Public Grievances Redress And Monitoring System) मार्फत २३मार्च ते १८ जून २०२० पर्यंतच्या प्राप्त तक्रारी.

मध्य रेल्वेला २३मार्च ते १८ जून २०२० या काळात “केंद्रीय सार्वजनिक तक्रार निवारण व देखरेख प्रणाली” च्या माध्यमातून भागधारकांच्या ४१२ तक्रारी प्राप्त झाल्या. मध्य रेल्वेच्या सार्वजनिक तक्रार सेलने जुन्या १४८ तक्रारींसह प्राप्त नव्या तक्रारींवर त्वरित कारवाई केली आणि ९३.२१% म्हणजेच एकूण ५६० पैकी ५२२ प्रकरणांचे निराकरण केले.
वरुण डंबल यांनी ईमेल पाठवून रेल्वेमार्गाद्वारे मालवाहतूक करून अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीस मदत करण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत कोविड बाधितांसाठी रेल्वेचे डबे तयार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. श्री देवांश गुप्ता यांनीही तिकीटाच्या परताव्यासाठी त्वरित दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *