
भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ येथील जुना सातारा भागात ५४ वृक्षाचे रोपण करण्यात येवून शिवसेनेचा ५४ वा वर्धापन दिन धूमधडाक्यात साजरा करण्यात आला.
सर्व प्रथम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन माजी शहर प्रमुख नीलकंठ( पंच्छी) फालक , शहर प्रमुख निलेश महाजन , बबलू बऱ्हाटे , पप्पू भैय्या बारसे सौ पूनम बऱ्हाटे , सौ भुराबाई चव्हाण , सौ शारदा धांडे , अँड श्याम गोदेकर, हेमंत चौधरी सर ,देवेंद्र पाटील, ललीत मुथा यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी जय भवानी जय शिवाजी ,कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला
१९ जून रोजी शिवसेना वर्धापन दिनानिमित्त दिपक धांडे यांच्या माध्यमातून ५४ झाडी लावण्यात आली व ह्या सर्व झाडांचे संवर्धन करण्यासाठी (ट्री गार्ड) सुध्दा लावण्यात आले ,जेणे करून ह्या लावलेल्या झाडांचे संगोपन करण्यात येईल व जस जसे ही झाडे मोठी होतील तस तशी शिवसेना सुध्दा भुसावळ शहरात व परिसरामध्ये मोठी होईल असा मनोदय दिपक धांडे यांनी वक्त केला . ह्या सर्व ट्री गार्ड वरती सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते म्हणून नावे टाकण्यात आलेली आहे
यावेळी बऱ्याच दिवसापासून सर्व जुने नवीन पदाधिकारी व शिवसैनिक एकत्र आल्याने सर्व शिवसैनिकांमध्ये चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले यावेळी युवा सेनेचे ता प्रमुख हेमंत बऱ्हाटे ,युवा सेनेचे सूरज पाटील, शिवसेनेचे प्रा धीरज पाटील ,अँड. नरेंद्र लोखंडे, गोकुळ बाविस्कर, सागर वाघोदे, जगू खेराडे, दत्तू नेमाडे राकेश देशमुख,अमोल ठाकरे,मिलिंद कापडे,धनराज ठाकूर,शरद जोहरे,पिंटू भोई संदीप भोई ,राकेश खरारे,योगेश बागुल,स्वप्नील सावळे,दिगंबर धनगर,नमा शर्मा यांच्या सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.



