भुसावळ ( प्रतिनिधी )- द लीगल प्रॅक्टिसनर्स डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन, भुसावळच्या वतीने महसूल प्रकरणांची सुनावणी आठवड्यातून किमान एक दिवस भुसावळ येथील प्रांताधिकारी कार्यालयात घेण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. भुसावळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्यादरम्यान बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. भूपेश बाविस्कर यांनी हे निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, निवडणूक कार्यक्रमानंतर महसूल प्रकरणांचे कामकाज जळगाव येथे वर्ग करण्यात आले असून, त्यापूर्वी ही सुनावणी भुसावळ येथे नियमितपणे होत होती. बार असोसिएशनने मागणी केली आहे की, दर आठवड्यातून किमान एक दिवस भुसावळ येथील प्रांताधिकारी कार्यालयात महसूल प्रकरणांची सुनावणी घेण्यात यावी. त्यामुळे भुसावळ, बोदवड, यावल, रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील वकील व पक्षकारांची होणारी गैरसोय टळेल. तसेच, जळगाव येथील कामाचा अतिरिक्त ताण कमी होऊन वेळेचीही बचत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी द लीगल प्रॅक्टिसनर्स डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. रम्मू पटेल, सचिव ॲड. अभिजीत मेने, सहसचिव ॲड. सुनील सोनार, महिला सहसचिव ॲड. वीणा एसने (शेंद्रे), कोषाध्यक्ष ॲड. प्रीतम मेढे, सहकोषाध्यक्ष ॲड. मुकेश चौधरी, ग्रंथपाल ॲड. जयश्री उदले (जैन) तसेच कार्यकारिणी सदस्य ॲड. प्रकाश पाटील, ॲड. चंद्रशेखर चतुर आणि ॲड. दर्शन लोखंडे उपस्थित होते. निवेदन सादर करताना बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. कैलास लोखंडे तसेच ॲड. राजेश शर्मा, ॲड. सचिन कोष्टी आणि ॲड. सुशील मेढे हेही उपस्थित होते.


