भुसावळ (प्रतिनिधी )-
शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त भुसावळ लक्ष्मी चौक
शिवसेना शाखेतर्फे लक्ष्मी चौक व रेल्वे स्टेशन नजिक शिवभोजन सेंटर जवळ कोरोनाच्य पार्श्वभूमीवर सॅनीटायझर मशिनचे लोकार्पण १९ जून रोजी आमदार संजय सावकारे तसेच शिवसेनेचे उपजिल्हाधिकारी अँड श्याम गोंदेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे .
शिवसेना पक्षप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी मराठी बाणा व मराठी अस्मिता हिंदुत्व जपण्याकरीता सुरु केलेली शिवसेना आजही अवीरतपणे ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करीत समाजसेवेसाठी उभी आहे आणि याच समाजसेवेच्या व्रताची मशाल हाती घेवून शिवसैनिकांनी ती तेवत ठेवली आहे .
याच अखंड समाजसेवेच्या अनुषंगाने कोरोना सारख्या भयावह परिस्थितीत कोरोनावर मात करन्याकरीता आज १९ जुन २०२० रोजी येथील लक्ष्मी चौक व शिव भोजन सेंटर स्टेशन रोड येथे सँनीटाझर मशीन लोकार्पण करण्यात येत आहे . प्रसंगी उद्घाटक म्हणून भुसावळचे आमदार संजय सावकारे, तसेच शिवसेना उपजिल्हा प्रमुख अँड. श्री श्याम गोंदेकर, नगरसेवक प्रा. दिनेश राठी, (सर) ,शिवसेना माजी शहर प्रमुख तथा नगरसेवक मुकेश गुंजाळ यांचेसह शिवसेनेचे आदीं पदाधिकारी उपस्थित राहणार आहे . उपस्थितीचे आवाहन आयोजक उमाकांत शर्मा (नमा ) शिवसेना शाखा लक्ष्मी चौक यांनी केले आहे .



