भगवान बुद्ध यांनी दिलेल्या पंचशीलाचे आचरण केल्याने मानवाचे चित्त शांत राहते ….. जयसिंग वाघ


जळगाव (प्रतिनिधी ) - भगवान गौतम बुद्ध यांनी कोणीही हिंसा , चोरी , व्यभिचार करू नये , खोटे बोलू नये , मद्य प्राशन करू नये असा उपदेश दिलेला आहे , हा उपदेश बौद्ध धर्मात ' पंचशील ' म्हणून ओळखले जाते. या पंचशिलाचे आचरण केल्याने माणसाच्या अनेक समस्या तर सुटतातच त्याच बरोबर त्याचे चित्त प्रसन्न  व शांत राहते असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी केले.
   अजिंठा हाउसिंग सोसायटी येथील जेटवन बुद्ध विहारात   आषाढ पर्णिमा ते आश्विन पौर्णिमा पर्यंत आजोजित ' भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ' या ग्रंथपठण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
    बौद्ध महसभाच्या केंद्रीय शिक्षिका ज्योती भालेराव यांनी सांगितले की , बौद्ध धर्मात आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा पर्यंत वर्षावस केला जातो , पहिला वर्षावास खुद्द भगवान बुद्ध यांनी सारनाथ येथील मुर्गदाय वनात केलेला आहे . या तीन महिन्यात महाराष्ट्रात प्रत्येक बुद्ध विहारात ' बुद्ध आणि त्यांचा धम्म ' या ग्रंथाचे पठण सुद्धा केले हस्ते .
  अध्यक्षस्थानी ॲड. आनंद कोचुरे होते , त्यांनी बौद्ध धर्माचे तत्व मानवी कल्याणाचे असल्याने त्याचा अधिकाधिक प्रचार करणे प्रत्येक उपसकाचे कर्तव्य आहे असे सांगितले .
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन दिलिप सपकाळे यांनी केले , त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धर्मांतराचे महत्व विषद केले .
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता बैसाने , आभार प्रदर्शन कविता सपकाळे यांनी केले. पूनम वानखेडे , संगीता सैंदाणे , वर्षा कोचुरे , लता बिऱ्हाडे यांनी त्रिसरण , पंचशील म्हटले , सिंधू तायडे , विजया शेजवळे , लक्ष्मी भालेराव , हिराबाई भालेराव  , नूतन तासखेडकर यांच्या हस्ते भगवान बुद्ध व  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. मान्यवरांचा परिचय सरला भालेराव , माया भालेराव यांनी करून दिला . 
   कार्यक्रमास रामकृष्ण सावळे , मनोज इंगळे , बळीराम गजरे , प्रतिभा सपकाळे , पूजा कोचुरे , अंजना भालेराव , आशा सपकाळे , गीता सोनवणे,  शुभांगी बोदोडे  ,  सुमन सोनवणे , उषा गांगले , मीना बिऱ्हाडे , रंजनी सैंदाणे , सुनंदा सैंदाणे तसेच अन्य उपसिका हजर होते .