नशिराबाद : बदलते हवामान, वाढते तापमान आणि पर्यावरणीय आव्हाने लक्षात घेऊन दावत-ए-इस्लामी इंडिया यांच्या सामाजिक विभाग GNRF (गरीब नवाज वेलफेअर फाउंडेशन) तर्फे दरवर्षी देशभर विशेष वृक्षारोपण अभियान राबविण्यात येते. या अभियानांतर्गत GNRF च्या स्वयंसेवकांनी आजपर्यंत संपूर्ण भारतात लाखो वृक्षांची लागवड केली आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून आज शनिवार १ऑगस्टरोजी नशिराबाद येथील के.एस.टी. उर्दू हायस्कूल येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेचे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्साहाने वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. याप्रसंगी दावत-ए-इस्लामी इंडिया, जळगाव जिल्हाध्यक्ष झुबैर अत्तारी यांनी नागरिकांना अधिकाधिक झाडे लावण्याचे व त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, आज लावलेले प्रत्येक झाड भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ, हिरवेगार आणि निरोगी पर्यावरण निर्माण करण्यास हातभार लावेल. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अब्दुल बासित अत्तारी, डॉ. अजीम शकील कुरेशी, वसीम कुरेशी सर, मोईज सर, आरिफ सर, झाहिद सर, कुरेशी आसिफ सर, फारूक सर तसेच GNRF चे जिल्हाध्यक्ष रफीक रोशन यांनी विशेष सहकार्य केले.


