व्हर्च्युअल पेंशन अदालतीत ४३ प्रकरणे निकाली ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्‍य रेल्‍वेच्‍या भुसावळ विभागातील कार्मिक विभागातर्फे सेवानिवृत रेल्‍वे कर्मचा-यांच्‍या पेंशन संदर्भातील समस्‍या सोडविण्‍यासाठी व्हर्च्युअल पेंशन अदालत १ याचे आयोजन करण्‍यात आले होते.
या पेंशन अदालतीत आलेले सर्व ४३ प्रकरणे निकाली काढण्‍यात आली व त्यावर चर्चा करून त्‍यांना ४ लाख २७ हजार ९३५ रू.देय रक्कम एनईएफटी व्‍दारे सेवानिवृत रेल्‍वे कर्मचा-यांच्‍या खात्‍यात तात्‍काळ वर्ग करण्‍यात आले.विभागीय रेल्‍वे व्‍यवस्‍थापक विवेककुमार गुप्‍ता,वरिष्‍ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांनी व्हर्च्युअल पेंशन अदालतीला संबोधित केले.कोव्‍हीड १९ कोरोनाच्‍या पाश्वभुमीवर आयोजित केलेल्‍या व्हर्च्युअल पेंशन अदालतीचे सेवानिवृत कर्मचारी व त्‍यांच्‍या संघटनेने यशस्‍वीरित्‍या पार पाडल्‍या बद्‍दल कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *