भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील डेली मार्केट परीसरातील जुन्या तालुका पोलिस ठाण्यानजीक लोणावळा येथील सुप्रसिध्द अमृततुल्य ‘एकच प्याला’ टी पॉईंटचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.
दहा रुपयात भुसावळकरांना मिळणार वाफाळलेला रूचकर चहा-
भुसावळकरांना अवघ्या दहा रुपयात आयुर्वेदिक मसाल्यांचा वापर करून बनवलेला गरमागरम वाफाळलेला रुचकर चहा येथे मिळणार आहे.
स्वच्छतेसह सॅनीटायझरला प्राधान्य तसेच निटनेटकी बैठक व्यवस्था(डिस्टनसिंग ) असलेल्या टी पॉईंटला भुसावळकरांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी, असे आवाहन संचालक संजयसिंग चव्हाण व नितीन जैन यांनी केले आहे. ग्राहक सेवेसाठी सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत ‘एकच प्याला’ टी पॉईंट भुसावळचे चार्जिंग स्टेशन सुरू राहणार असल्याचेही सांगितले .




