आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात सामाजिक उपक्रम; युवा नेतृत्वाचे गुलाबराव वाघ यांच्याकडून कौतुक

धरणगाव : तरुणाईचा आवाज बनून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्य करणारे, नव्या विचारांना दिशा देणारे आणि लाखो युवकांच्या हृदयात आशेचा दीप प्रज्वलित करणारे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगाव येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते तथा संपर्क प्रमुख -नंदूरबार जिल्हा व रावेर लोकसभा. गुलाबराव वाघ यांनी आदित्य ठाकरे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना युवकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात बोलताना गुलाबराव वाघ म्हणाले की, “मा. आदित्य ठाकरे म्हणजे जिद्द, दूरदृष्टी आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी यांचा प्रेरणादायी प्रवास आहे. राजकारणात नवा आदर्श निर्माण करून युवकांना बळ देण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत.”

युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी यांनी आपल्या मनोगतात आदित्य ठाकरे यांना शिवसेनेतील झुंजार नेतृत्व, पर्यावरणवादी विचारांचे पुरस्कर्ते आणि संकटाच्या काळात पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळणारे नेतृत्व असे संबोधले. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जानकीराम पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख जयदीप पाटील, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील परदेशी, नगरसेवक लक्ष्मण महाजन, भागवत चौधरी, हेमंत महाजन, आत्माराम शिरसाठ, किरण अग्निहोत्री, लीलाधर पाटील, फिरोज खान, राहुल रोकडे, रियाज बागवान, विनोद रोकडे, रमेश चव्हाण, रणजित सिकरवार, शुभम महाजन, ज्ञानेश्वर महाजन, गजानन महाजन, अरविंद चौधरी यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान शिवसेनेचे उपतालुका प्रमुख रणजित सिकरवार यांचाही वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.