भुसावळ (प्रतिनिधी )-
-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे मोदी सरकार ०.२एक साल काम अनेक या कार्यक्रमाचे शुभारंभ आज दि.८ जुन सोमवार रोजी भुसावळ शहरात आ.संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. या अंतर्गत शांतीनगर पंतप्रधान जनकल्याणकारी योजनांचे जनजागृती पत्रक परिसरात घरोघर वाटण्यात आले. या प्रसंगी भाजप जिल्हा संघटन सचिव प्रा.डाॅ सुनिल नेवे,शहराध्यक्ष दिनेश नेमाडे,शहर सरचिटणीस पवन बुंदेले व अमोल महाजन. नगरसेवक अमोल इंगळे,गिरीष महाजन, प्रथम बुंदेले,भंगाळे सर,निलेश कोळी व कार्यकर्ते उपस्थित होते.



