भुसावळ तालुक्यात १७ मे रोजी वीर शिरोमणी महाराणा प्रताप जन्मोत्सव सोहळा;मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार.

भुसावळ (प्रतिनिधी) – अखंड भारताचे स्वाभिमान, अजेय योद्धा आणि शौर्याचे प्रतीक क्रांतीसूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जन्मोत्सवा निमित्त भुसावळ तालुक्यातील खेडी बु.येथे भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा भुसावळ विधानसभेचे आमदार संजय सावकारे उपस्थित राहणार आहेत.

मिरवणूक आणि महाआरतीचे आयोजन.

हा जन्मोत्सव सोहळा रविवार,दि १७ मे रोजी खेडी बु. येथे सायंकाळी साजरा केला जाईल.
कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे,
सायंकाळी ६:०० वाजता: हनुमान मंदिर येथून टाळ-मृदंगाच्या गजरात आणि जयघोषात वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या भव्य दिव्य पालखी मिरवणुकीला सुरुवात होईल. या मिरवणुकीची सांगता विठ्ठल मंदिर येथे होईल. सायंकाळी ७ वाजता: विठ्ठल मंदिर येथे मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते महाराणा प्रताप जी यांची महाआरती करण्यात येईल.

ग्रामस्थांचे उपस्थितीचे आवाहन.
या ऐतिहासिक आणि मंगलमय सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी चोरवड आणि खेडी बु.येथील समस्त ग्रामस्थांनी व निमंत्रकांनी परिसरातील नागरिकांना आवाहन केले आहे. या कार्यक्रमाला सर्व नागरिकांनी सहकुटुंब,सहपरिवार आणि विशेषतः गावातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.