कोरोनावर मात करून बाजारपेठ पोलीस कर्मचारी पुन्हा सेवेत दाखल ;

भुसावळ (प्रतिनिधी) –
भुसावळ येथील पोलीसO कर्मचारी मालेगाव येथे बंदोबस्त कामी गेले असता दुर्दैवाने कोरोनाग्रस्त झाले , उपचार व आत्मविश्वास यामुळे कोरोनावर मात करून सुखरूप परतले , पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या सह सर्व कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात व पुष्पवर्षाव करून स्वागत करून त्यांचे मनोबल वाढविले.
भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने मालेगाव बंदोबस्तासाठी गेले असतांना दुर्दैवाने त्यांना कोरोनाची लागण झाली.
मात्र खचून न जाता न त्यांनी या कठीन परिस्थितीमध्ये सुद्धा कोरोनाशी लढून विजय मिळवला .
यावेळी बाधित कर्मचारी यांचा दृढ़ आत्मविश्वास खंबीर असल्याने न डगमगता त्याच्या परिवारनेही त्यांना सहकार्य केले. कोरोना बाधित पोलीस कर्मचाऱ्याला उपचारासाठी नाशिक येथे रवाना करण्यात आले होते. दरम्यान कोरोनाशी फाईट देऊन युद्ध जिंकून पोलीस कर्मचारी बाजारपेठ पोलीस स्टेशनला परतल्याने पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या सह सर्व कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात व पुष्प वर्षाव करून स्वागत करून त्यांचे मनोबल वाढविले.भुसावळातील बाजारपेठच्या कोरोना बाधित पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.आपले मनोबल खचू न देता कुठलीही भीती न ठेवता कोरोनवर मात करता येऊ शकते हे पोलीस योद्धा यांनी दाखवून दिले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *