कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या योद्ध्यांचा प्रधानमंत्री जनकल्याण योजना समिती व साई निर्मल फाउंडेशन तर्फे सन्मान ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना विषाणूंच्या संक्रमणापासून स्वतःचा जीव धोक्यात घालून तहान भूक विसरून अहोरात्र परिश्रम करून आपणा सर्वाना वाचविणाऱ्या, कोरोना विषाणूचा समूळ नायनाट व्हावा म्हणून सेवा हेच कर्तव्य , हे ब्रीद मनात ठेवून निस्वार्थपणे जनतेच्या संरक्षणासाठी कोरोना विषाणूशी दोन हात करणाऱ्या, तसेच आपण या समाजाचे काहीतरी देणं लागतो म्हणून सामाजिकतेची जाण आणि बांधिलकीची जपणूक करावी .म्हणून कोरोनाव्हायरस च्या लढ्यामध्ये लढणारे या सर्व वीरांच्या पंखामध्ये बळ व नवचैतन्य निर्माण व्हावे यासाठी प्रभाग 22 मधील कस्तुरी नगरातील कंटेनमेंट झोन मधील अविरत सेवा देणाऱ्या जळगाव पोलिस मुख्यालयातील महिला पोलीस कर्मचारी यांचा जळगाव जिल्हा प्रधानमंत्रीजनकल्याण योजना प्रचार व प्रसार समिती व साई निर्मल फाउंडेशन भुसावळ यांच्यातर्फे या समितीचे व संस्थेचे जिल्हाध्यक्ष शिशिर जावळे व परिसरातील महिला भगिनींनी पुष्पगुच्छ व फराळ देऊन सत्कार करून या महिला कर्मचाऱ्यांचे आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *