भुसावळ (प्रतिनिधी) – येथील श्री लक्ष्मीमाता चौक परिसरातील पुरातन श्रीराम मंदिरामध्ये पुरुषोत्तम मासानिमित्त (अधिक मास) आज पासून (दि.१७) विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे थाटात आयोजन करण्यात आले आहे. दि १५ जुन पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे नियोजन सरिता चौक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे.या महिनाभराच्या महोत्सवात भाविकांसाठी दररोज विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दररोज सकाळी ६ ते ७ या वेळेत काकड आरती,ईश्वर पुजा अर्चा,भजने व भक्तीगीतांचे गायन होणार आहे. त्यानंतर सकाळी १० ते १२ या वेळेत मंगला कुलकर्णी यांच्या सुश्राव्य वाणीतून अधिक मासाच्या विशेष महात्म्य पोथीचे वाचन केले जाईल. तसेच दररोज संध्याकाळी ७ वाजता महाआरती होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
*भव्य नियोजनासाठी समितीची जय्यत तयारी*..…
या धार्मिक महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सरिता चौक,राधेश्याम लाहोटी,जे.बी.कोटेचा,सत्यनारायण शर्मा,विनोद शर्मा,गोपाल चांडक, प्रा.दिनेश राठी,भूषण जोशी,रामचंद्र गचके,विजय कुलकर्णी हे परिश्रम घेत आहेत. तसेच महिला मंडळातर्फे मनिषा इखे,कविता नाईक,विमल कोटेचा,प्रभावती पाटील,धनश्री जोशी,निर्मला चौधरी,भारती पाटील,राजश्री चौधरी,सविता चौक,मेघा कुरकुरे,वर्षा लोखंडे,प्रभा दुसाने,प्रभा सातपुते,मंगला नवगाळे,शशी चौधरी,आशा खराटे,अरुणा अग्रवाल,विशाखा नाईक,स्मिता दुसाने,लक्ष्मी पाटील,मालती पाटील यांसह परिसरातील अनेक भाविक बंधू-भगिनी उपस्थित राहणार आहेत. या महिनाभर चालणाऱ्या धार्मिक पर्वणीचा भुसावळ शहर व परिसरातील समस्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.



