भुसावळात नियमांचे उल्लंघण ; तीन दुकानांना ठोकले सील ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाचा वाढता फैलाव व बाजारपेठेत होणारी गर्दी पाहता प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी व्यावसायीकांना दुकाने उघडून द्यावयाचे दिवस ठरवून दिले आहेत शिवाय नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे मात्र त्यानंतरही ठरवून दिलेल्या दिवशी दुकान न उघडता नियम मोडल्याने शहरातील तीन दुकानांना सील ठोकण्याची कारवाई प्रभारी मुख्याधिकारी किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
पालिकेच्या पथकाने केल्याने शहरातील व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली.
शहरातील सियाराम कॉम्प्लेक्समधील जय वैष्णव माता प्रोव्हीजन, आठवडे बाजारातील जयहिंद बेकरी तसेच खडका रोडवरील एका इंजिनिअरींग वर्कशॉप दुकानदारांनी उल्लंघन केले म्हणून पालिकेच्या प्रशासकीय अधिकारी चेतन पाटील, अभियंता पंकज पन्हाळे, लेखापाल संजय बाणाईत, रामदास म्हस्के, किरण मनवाडे, राजू पाटील आदींच्या पथकाने
कारवाई करून सील ठोकले. पुढील आदेश येईपर्यंत आता व्यावसायीकांना दुकान उघडता येणार नाही शिवाय नियम मोडल्यास आणखी कठोर कारवाई होण्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *