भुसावळात रेल्वे विद्युत लोको शेडमध्ये महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील रेल्वे विद्युत लोको शेडमध्ये दि. ९ मे रोजी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शेडचे मुख्य विद्युत अभियंता चाणक्य जैन यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना चाणक्य जैन यांनी महाराणा प्रताप यांच्या गौरवशाली जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या शौर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेचा वारसा जपण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला विविध रेल्वे संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये ललित भारंबे (सचिव, एनआरएमयू विद्युत शाखा), जयेश ढाकणे (सीआरएमएस), विशाल सपकाळे (एससीएसटी असोसिएशन), महेश राणे (ओबीसी असोसिएशन), ललित कुमार मुथा (मंडळ अध्यक्ष, रेल कामगार सेना), नागसेन यशोदे (एबीसी युनियन) यांच्यासह महाराणा प्रताप जयंती समितीचे रणजित चौधरी, अमित राजपूत, दीपक पाटील, अमोलसिंग राजपूत, राहुल राजपूत, विष्णूसिंग, ललित चौधरी, यश राजपूत, आयुष सिंग, आशिष शिसोदिया, भूषणसिंग राजपूत, सुधीर कुमार, बाळू चौधरी, रिंकूकुमार सिंग, तरुण सिंग, नितीन परदेसी, रुपेश कुमार, अजय महाजन, राजेश खरे, विपीन कुमार, सुरेंद्र मीना, लक्ष्मणसिंग चौधरी, नयनसिंग राजपूत, अजय पाटील, बिंकू कुमार, राहुलसिंग राजपूत, संतोष सिंग, मयूर कोल्हे, दीपक बोराडे, मनोज सिंगले, राजीव सिंग, राजू जाधव, अविनाश सुरवाढे, रितेश पाटील, सुरेश मीना, दीपक सकपाळे, विजय ठाकूर, कमलेश सोनार, हरीश पाथराळ, चैतन्य धांडे, अक्षय महाजन, ईश्वर चव्हाण, सुमेध साळवे, विजय चौधरी आदी रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन तायडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार रणजित चौधरी यांनी मानले.