भुसावळात रेल कामगार सेनेतर्फे ‘कामगार दिन’ उत्साहात;गुणवंत रेल्वे कर्मचाऱ्यांचा गौरव.

भुसावळ (प्रतिनिधी) :येथील रेल्वेच्या इलेक्ट्रिक लोको शेडमध्ये रेल कामगार सेनेतर्फे जागतिक कामगार दिन,महाराष्ट्र दिन आणि महापुरुष जयंतीचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रेल कामगार सेनेचे केंद्रीय अध्यक्ष विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली आणि सरचिटणीस दिवाकर देव व कार्याध्यक्ष संजय जोशी यांच्या मार्गदर्शना खाली हा सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमात रेल्वेच्या विविध विभागांत उल्लेखनीय आणि कर्तव्यदक्ष सेवा बजावणाऱ्या २५ गुणवंत कामगारांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेस माल्यार्पण व द्वीप प्रज्वलन करून करण्यात आली, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करण्यात आला.
या वेळी मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रसंगी इलेक्ट्रिक लोको शेडचे वरिष्ठ मंडळ विद्युत अभियंता चाणक्य जैन,उपमुख्य विद्युत अभियंता पवन कुमार,मंडळ विद्युत अभियंता सिरीन संचय,सहायक विद्युत अभियंता प्रताप तंतूवे आणि रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललित कुमार मुथा प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी चाणक्य जैन व ललित मुथा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत कामगारांच्या योगदानाचे कौतुक केले.
यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
ललित मुथा,राजेश लखोटे,प्रीतम टाक,विनोद वाघे,योगेश माळी संजय चौधरी,विजय पाटील,दिपक पाटील,सुजित भोळे,कृष्णा महाजन,रुपेश तायडे,कृष्णा भोंडवे,दीपक तायडे,गणेश कुलकर्णी,दीपक भावसार,कुणाल चव्हाण,कमलेश परदेशी,चंदन भंगाळे,शैलेश पाटील,समाधान बोरसे,भूषण पाटील,ऋषिकेश पाटील,अनिल आहेर,रमेश मोटे,संदीप लोहार,अरविंद थोरात,मुकेश महाजन,नितीन अमरोही,भरत शर्मा,प्रसाद सोनवणे,अजय पाटील,नितीन परदेशी यांच्यासह रेल कामगार सेनेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुनसफ अली यांनी केले,तर आभार प्रदर्शन ललित कुमार मुथा यांनी मानले.या सोहळ्याला रेल्वे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो कॅप्शन -१) रेल्वेतील गुणवंत कर्मचारी यांना सन्मानित करताना चाणक्य जैन सोबत पवन कुमार,सिरीन संचय,प्रताप तंतूवे,ललित कुमार मुथा.

फोटो कॅप्शन -२) भुसावळातील रेल्वेच्या इलेक्ट्रिक लोको शेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करताना चाणक्य जैन सोबत पवन कुमार,सिरीन संचय,प्रताप तंतूवे,ललित कुमार मुथा.