नेवे वाणी समाज मंडळ पुणेच्या स्नेहसंमेलनात महारक्तदान शिबिरासह मान्यवरांचा गौरव

पुणे -नेवे वाणी समाज मंडळ पुणे यांचे १६ वे स्नेहसंमेलन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंग मंदिर येरवडा पुणे येथे येथे रविवार दिनांक ३ मे रोजी संपन्न झाले.रक्तदान शिबिर, वधूवर परिचय मेळावा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि श्री शिवरत्न प्रतिष्ठान जळगाव तर्फे शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील आताच्या परिस्थितीवरील विचार “मी येतोय” या एकपात्री प्रयोगामुळे कार्यक्रमास रंगत आली.
स्व.सौ.श्‍वेता वाणी- नेवे फाऊंडेशन जळगाव व नोबेल ब्लड सेंटर हड़पसर पुणे आयोजित रक्तदान शिबिरात ४० दात्यांनी रक्तदान करून योगदान दिले.

शिबिराच्या यशस्वितेकरिता फाऊंडेशनतर्फे अध्यक्ष मिलिंद नेवे वाणी नोबेल ब्लड सेंटरचे जनसंपर्क अधिकारी प्रविण जाधव व डाॅ.संगिता व टिमचे सहकार्य लाभले.तसेच सामाजिक उपक्रम म्हणून यावेळी स्त्री रोग तज्ञ डॉ. वैशाली माळी यांनी स्त्री आणि स्त्रियांचे आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले.तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात येवून संघ प्रार्थना घेण्यात आली.
नाशिक येथील किरण वसंत नेवे यांना समाज भूषण पुरस्कारांने गौरविण्यात आले.साकळी येथील सेवानिवृत्त बँक अधिकरी राजेंद्र श्रीधर नेवे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. जळगाव येथील सेवानिवृत्त लघुलेखन जिल्हा न्यायालय जळगाव,वंदना दिलीप वाणी, खामगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या भक्ती भूषण वाणी, इंदोर येथील प्रशांत मधुकर वाणी,संभाजीनगर येथील लिपोटऀ हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक जितेंद्र तात्याराव नेवे, जळगाव येथील उद्योजक धीरज प्रकाश दलाल तसेच धुळे उद्योजक, पंकज दिनकर नेवे उपस्थित होते.

अखिल भारतीय नेवे वाणी समाजातील रूढी परंपरा याचे जतन करण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले.सदर स्नेहसंमेलनच्या यशस्वितेकरिता नेवे वाणी समाज मंडळ पुणे स्नेहसंमेलन कार्यकारी समिती तुषार नेवे, किरण वाणी ,दीपक नेवे ,श्रीकांत नेवे ,प्रसन्न व प्रमोद नेवे,मिलिंद वाणी,निलेश व महेश नेवे तेजस्विनी नेवे ,पूजा नेवे, अश्विनी नेवे,दीपिका नेवे यांनी परीश्रम धेतले.