भुसावळ रनर्सचा अनोखा उपक्रम; गच्चीवर धावून साजरा केला ‘ग्लोबल रनिंग डे’ ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
जून महिन्याचा पहिला बुधवार हा ग्लोबल रनिंग डे जगभरात साजरा केला जाता परंतु यावर्षी लॉकडाऊनमुळे जगभरातील धावपटूंना हा दिवस या वर्षी साजरा करता आला नाही परंतु भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनच्या धावपटूंनी हा दिवस घराच्या गच्चीवर तसेच प्रांगणात धावून साजरा केला. भुसावळचे धावपटू शहरात दर मंगळवार, गुरूवार व रविवार धावण्याचा नियमित सराव करीत असतात व त्या शिवाय देशातील वेगवेगळ्या मँरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत असतात परंतु लॉकडाऊन सुरू झाल्यापासून त्यांनी गच्चीवर धावण्याचा सराव सुरू केला त्याचबरोबर देशातील विविध संस्थांनी आयोजित केलेल्या ‘इंडोर व्हर्च्युअल रनमध्ये ‘त्यांनी सहभाग नोंदविला त्यामुळे हा दिवस साजरा करण्यासाठी सर्व धावपटूंनी आपल्या गच्चीवर धावायला सुरुवात केली व अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा केला.
घरीच धावण्याचा सराव करण्याचे आवाहन –
प्रशासनातर्फे नजीकच्या काळात बाहेर धावायला परवानगी मिळू शकते परंतु त्याचबरोबर शहरात कोरोना रुग्णांची संख्यादेखील सतत वाढत आहे त्यामुळे प्रत्येकाने घरी धावण्याचा सराव करावा व व्यायाम करावा, असे आवाहन प्रवीण फालक व डॉ.तुषार पाटील यांनी केले आहे. या उपक्रमात स्वाती फालक, डॉ.चारुलता पाटील, गणसिंग पाटील, अशोक पाटील, सचिन मनवानी, दीपेश सोनार, प्रवीण वारके, रंजीत खरारे, प्रदीप सोळंकी, प्रवीण पाटील आदी सदस्यांनी सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *