भुसावळ (प्रतिनिधी )-
संपूर्ण देश कोरोना विषाणूच्या विरोधात आज लढत आहे़ कोरोनाग्रस्त रुग्णांना रक्ताची कमतरता भासत आहे. करोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने महाराष्ट्रात रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु, सध्याची गंभीर परिस्थिती लक्षात घेता शिवसेना जिल्हा प्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील, उपजिल्हा संघटक विलास मुळे व तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी शिवराज्याभिषेक दिन व शिवसेना नेते जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक ४ जून ते ६ जून दरम्यान भुसावळ शिवसेना परिवार व मुक्ती फाऊंडेशनच्या वतीने गोळवलकर रक्तपेढी, धन्वंतरी रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.
पावसावर मात करीत रक्तदान:
या रक्तदान शिबिरामध्ये सकाळच्या सत्रात पावसावर मात करीत शिवसेना उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, पवन नाले यांनी सुद्धा रक्तदान केले. भुसावळातील शिवसैनिकांसोबत प्राध्यापक, अभियंते, महावितरण कर्मचारीसोबत जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, यावल, चोपडा येथील ३० रक्तदात्यांनी सकाळ व दुपारच्या टप्प्यात रक्तदान केले.प्रसंगी रक्तदात्यांना कृतज्ञता पत्र देऊन गौरविण्यात आले.
रक्तदात्यांच्या आरोग्याची विशेष काळजी:
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढयांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. हा तुटवडा दूर करण्याच्या द़ृष्टीने हे रक्तदान शिबीर आयोजित केले. रक्त पेढीच्या गाडीत रक्त संकलन केले तसेच रक्तदान करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या या सर्व तरुण कार्यकर्त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी या शिबिरात घेण्यात आली, शिबिर स्थळी आरोग्य तपासणीसह वारंवार सॅनीटायझर याचा वापर करुन उपस्थितांचे हात, खुर्च्या निर्जंतूनीकिरण केले असे आयोजक बबलू बऱ्हाटे यांनी यावेळी सांगितले.
तरुणाईने अधिकाअधिक रक्तदान करावे:
रक्तदान हेच जीवनदान आहे, तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईने अधिकाअधिक रक्तदान करावे असे आवाहन शिवसेना तालुका संघटक प्रा.धिरज पाटील यांनी केले.
दरम्यान ललित मुथा, प्रा.धिरज पाटील, संतोष सोनवणे, निलेश महाजन, अन्सार शहा, पुनम बऱ्हाटे, भुराबाई चव्हाण, गोकुळ बाविस्कर, फिरोज तडवी, विनोद गायकवाड, शरद जोहरे, गणेश पाटील, नामदेव बऱ्हाटे यांचेसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांनी कार्यक्रम स्थळी भेट दिली .



