भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील रेल्वेचे सेवानिवृत लोको पायलट या चोकोजी आव्हाड या ९० वर्षीय ज्येष्ठ नागरिक सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या काळात त्यांना त्रास झाल्यानंतर त्यांचे स्वॅब घेण्यात आले व त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.या नंतर त्यांना भुसावळ येथील मध्य रेल्वे हॉस्पिटल केविड सेंटर मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.या दरम्यान चोकोजी आव्हाड यांनी कोरोना आजाराशी कडवी झुंज देत ते कोरोना आजारातून मुक्त झाले व त्यांना आज दि.३ जून गुरुवार रोजी सुट्टी देण्यात आली.यावेळी त्यांनी रेल्वे हॉस्पिटल केविड सेंटर मधील डाॅक्टर व कर्मचा-यांबद्दल आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, रेल्वे हॉस्पिटलचे डॉक्टर,नर्स व कर्मचा-यांनी माझ्यावर तातडीने उपचार करून त्यांच्यातर्फे मला चांगली सेवा देण्यात आली. तसेच हॉस्पिटलमध्ये स्वच्छता चांगल्या प्रकारची होती व कोरोना संसर्गाचा उपचारा दरम्यान सर्व नियमांचे योग्यरित्या पालन करण्यात आल्याने हे शक्य झाले असे स्पष्ट केले.यावेळी त्यांचा रेल्वे रूग्णालय कर्मचा-यांतर्फे सत्कार करण्यात आला.



