भुसावळ (प्रतिनिधी )-
आर्या फाउंडेशन संचलित नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रा तर्फे 31 मे हा धूम्रपान विरोधी दिवस साजरा करण्यात आला यानिमित्त एक हात मदतीचा म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत आशा वर्कर्स यांना जीवनावश्यक वस्तु देवून सत्कार करण्यात आला .
यावेळी डॉ.सोपान बोराटे, महाराष्ट्र नशाबंदी मंडळा चे समनव्यय चंद्रकांत चौधरी ,प्रा.कुरकुरे , योगेश अग्रवाल, विजय फिरके, अरुणोदय फौंडेशन चे अध्यक्ष अरुण तायडे ,लता तायडे, यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तंबाखु ,गुटखा ,पान, बिडी ,सिगारेट हे असे व्यसनं आहेत,की ज्या मूळे व्यक्तीचे शाररीक आणि मानसिक दोन्ही प्रकारे हानी होते,
नवजीवन हॉस्पिटलमध्ये धूम्रपान विरोधी दिवस हा “तंबाखू मुकत जीवनाची शपथ देऊन साजरा करण्यात आला,
या प्रसंगी डॉ.वंदना वाघचौरे यांनी गेले अनेक वर्षे आर्या फौंडेशनच्या संपूर्ण टीमच्या सहकार्याने जिल्ह्यात व्यसनमुक्ती अभियान कसे यशस्वीपणे राबविले व अनेकांचे आयुष्य कसे व्यसनाधीनतेतून वाचविले हे सांगितले, जर शासनाने योग्य मदत केली तर व्यसनमुक्त भुसावळ पासून सुरवात करून व्यसनमुक्त जळगाव जिल्हा ही संकल्पना नक्कीच अमलात आणू असे सांगितले.
महाराष्ट्र नशाबंदी मंडळाचे कार्यकर्ते चंद्रकांत चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक मांडले त्यात तंबाखू कशी शारीरिक हानी करतो,त्यासाठी त्यास कशा पद्धतीने आयुष्यातुन हद्दपार करावे हे मांडले,
आपल्या मार्गदर्शनात डॉ.सोपान बोराटे यांनी व्यसनांचे मानसशास्त्रीय अंग सविस्तर स्पष्ट करून ,आपण व्यसनांचा तिरस्कार करावा व्यसनी व्यक्तीचा नाही,असे सांगितले,
तसेच आपण सर्वानीच व्यसनमुक्ती चा निर्धार करावा व परिसर व्यसनमुक्त ठेवावा ही शपथ घेतली,
कोरोनाच्या कहरात सर्व जनजीवन होरपळले जात आहे, बऱ्याच दानी संस्थानी गरजू लोकांना मदत केली . कोरोनाच्या पार्श्वभूमिवर नगरपालिकेच्या दुर्लक्षित आशा वर्कर घरोघरी उन्हातान्हात फिरुन इमानेइतबारे आपली सेवा बजावत आहेत. यामध्ये बऱ्याच जणी खूप गरजवंत आहेत, अशा गरजवंत आशा वर्कर ताई यांना आर्या फौंडेशन अध्यक्ष उमेंद्र वाघचौरे यांचे कडून एक मदतीचा हात देऊन मदत करण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वितेसाठी
आर्या फौंडेशन मॅनेजमेंट टीमच्या
सुवर्णा इंगळे, मालती येवले,
सुरेखा साळवे, छाया चौधरी , पिंकी जेधे यांनी परिश्रम घेतले



