आईच्या स्मृती प्रित्यर्थ ललवाणी परीवारातर्फे मुसळी तांड्यात मास्क व खाद्यसामुग्रीचे केले वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा.डाॅ.डि.एम.ललवाणी यांच्या मातोश्रीचे नुकतेच दु:खद निधन झाले होते.त्यामुळे त्यांनी आईच्या स्म्रुतीप्रित्यर्थ अत्यंत गरीब वस्ती असलेल्या शहरापासुन 20कि.मी.अंतरावर असलेल्या मुसळी तांडा येथे सर्वांना कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मास्क,बिस्कीट,मॅगी चे वाटप केले तर प्रशांत कोटेचा व कमलेश निकुंभे यांनी फरसाण,चिप्स नमकीनचे वाटप केले.या वेळी लोकल शालेय समिती चेअरमन विनोद राठोड यांनी कृतज्ञता व्यक्त केली.वाटप मदनलाल ललवाणी,प्रा.दिलीप ललवाणी,नलीन ललवाणी,मानस ललवाणी,प्रशांत कोटेचा,कमलेश निकुंभे यांनी आदराने स्वहस्ते तांड्यातील कुटुंबाना केली , तसेच प्रा.ललवाणी यांनी शहरातील सेवाभावी कार्य करणार्या विनयशिल संदिप पाटील यांच्या अंतर्नाद प्रतिष्ठानला सुध्दा आईचे स्मृतीप्रित्यर्थ आर्थिक मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *