भुसावळ कृउबा समिती संचालकपदी चारुलता महाजन यांची बिनविरोध निवड :

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदावर चारुलता कैलास महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कैलास शामराव महाजन यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ही नियुक्ती करण्यात आली आहे.

ही निवड प्रक्रिया मंत्री संजय सावकारे, सभापती अनिल वारके, उपसभापती तसेच संचालक मंडळाच्या सहकार्याने पार पडली. चारुलता महाजन यांच्या निवडीमुळे बाजार समितीच्या कामकाजात अधिक गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. वसंतराव झारखंडे, नगरसेवक संतोष चौधरी (दाढी), अॅड. बोधराज चौधरी, निखिल पाटील, शंकर चौधरी, शिवाजी पाटील तसेच माळी समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.