भुसावळ (प्रतिनिधी ) –

भुसावळात ‘हितगुज’ कार्यक्रमाचे आयोजन
भुसावळ(प्रतिनिधी ) : शहरातील सकल लेवा महिला मंडळातर्फे महिलांसाठी ‘हितगुज’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार, ६ मार्च रोजी दुपारी ३.०० वाजता सराफ बाजाराजवळील श्रीराम मंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला एकत्र येऊन विविध सामाजिक, कौटुंबिक तसेच वैयक्तिक विषयांवर संवाद साधणार आहेत. परस्परांमध्ये विचारांची देवाणघेवाण करत सकारात्मक चर्चेला चालना देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. तसेच या संवादातून समाजासाठी काही चांगले उपक्रम राबविण्याचा मानसही मंडळाने व्यक्त केला आहे.
या कार्यक्रमास जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सकल लेवा महिला मंडळातर्फे करण्यात आले आहे.


